सुप्रसिद्ध मूर्तिकार राजन खातू यांचे निधन

मुंबईतील सुप्रसिद्ध मूर्तिकार राजन खातू यांचे आज सकाळी अल्पशः आजाराने निधन झाले. ते 58 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.

वयाच्या सोळाव्या वर्षापासून राजन खातू हे मूर्तिकला क्षेत्रात होते. वडील तसेच वडील बंधू यांच्यासोबत ते काम करायचे. त्यांनी मुंबईतील अनेक प्रसिद्ध गणेश मंडळांच्या गणेशमूर्ती घडवल्या होत्या. आतापर्यंत त्यांनी दीड हजार मूर्ती घडवल्या होत्या. त्यात पर्ह्टचा राजा, अंधेरीचा राजा, बल्लाळेश्वर आदी गणेश मंडळांचा समावेश होता.

राजन खातू यांच्या पार्थिवावर आज दुपारी दोन वाजता शिवाजी पार्प स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याप्रसंगी विविध मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या