राजन साळवी यांच्या आमदार निधीतून 50 लाख रूपये निधी, 4 व्हेटिंलेटरसह अन्य साहित्य खरेदी करणार

663

राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी ह्यांची स्थानिक आमदार निधी मधून आपल्या साठी जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या देवदूताच्या साहित्यासाठी 50 लाखाची तरतूद केली आहे. या निधीमधून चार व्हेटिंलेटर घेण्याची सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत.

जीवाची पर्वा न करता कोरोना ग्रस्त रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय तसेच शासकीय अधिकारी, तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी व पोलीस यंत्रणा यांच्यासाठी जिल्हा आरोग्य रुग्णालय रत्नागिरी, राजापूर तहसीलदार, प्राथमिक आरोग्य केंद्र राजापूर, ग्रामीण रुग्णालय राजापूर, पंचायत समिती राजापूर, लांजा तहसीलदार, प्राथमिक आरोग्य केंद्र लांजा, ग्रामीण रुग्णालय लांजा, पंचायत समिती लांजा, महावितरण कंपनी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र साखरपा  यांनी कोरोना तपासणी किट आणि मार्क तसेच हॅन्ड सॅनिटीझर या साहित्याची मागणी  आमदार राजन साळवी ह्यांच्या कडे केली होती.  आमदार राजन साळवी  ह्यांनी तात्काळ आपल्या स्थानिक विकास आमदार निधी मधून ५० लाख रुपये किमतीचे साहित्य खरेदी व मतदारसंघासाठी 4 व्हेंटिलेटर खरेदी करण्या बाबतचे पत्र जिल्हा नियोजन अधिकारी, रत्नागिरी यांच्याकडे देऊन साहित्य खरेदी करण्याबाबत सूचना केल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या