
राजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत केंद्रस्थानी राहिलेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी महायुतीच्या उमेदवार श्रुती ताम्हनकर यांचा ३३८ मतांनी पराभव करून बाजी मारली.
नगर परिषदेच्या दहा प्रभागातील वीस जागांच्या निकालात महायुतीसह महाविकास आघाडीला प्रत्येकी दहा जागा प्राप्त झाल्या आहेत. निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीच्या वतीने जवाहर चौकात गुलालाची उधळण करीत फटाक्यांची जोरदार आतषबाजी करीत विजयाचा जल्लोत्सव साजरा करण्यात आला. लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून विजयी झालेल्या महाविकास आघाडीच्या ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी दुसऱ्या वेळी थेट मतदारांमधून विजय मिळविणाऱ्या पहिल्या महिला नगराध्यक्षा ठरल्या आहेत.
राजापूर नगर परिषदेच्या दहा प्रभागातील वीस जागांच्या निकालात महाविकास आघाडीसह महायुतीने प्रत्येकी दहा जागा जिंकल्या. नगर परिषदेत समसमान संख्याबळ झाले. नगराध्यक्षपदी विजय झाल्याने आता अकरा संख्यबळ प्राप्त झालेल्या महाविकास आघाडीने राजापूर नगर परिषदेवर सत्ता मिळविली आहे. विजयानंतर महाविकास आघाडीच्या वतीने जवाहर चौकात जोरदार जल्लोष करण्यात आला. फटाक्यांची आताशबाजी आणि गुलालाची उधळण करण्यात आली. जोरदार घोषणा देण्यात आल्या.





























































