
-केन्द्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांना विरोध करणारा राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी हा सहयोगी पक्ष केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत (एनडीए ) राहायचे कि नाही , याबाबतचा निर्णय उद्या 8 डिसेंबरला घेणार आहे. पक्षाचे अध्यक्ष हनुमान बेनीवाल यांनी रविवारी ही घोषणा केली आहे.
आरएलपी पक्षाची राजस्थानात भाजपशी युती आहे. मात्र उद्याच्या शेतकऱयांच्या भारत बंदला आरएलपीनेही आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आणखी एक प्रादेशिक पक्ष एनडीएला सोडचिट्टी देण्याचे संकेत मिळाले आहेत. आरएलपीचे प्रमुख आणि राजस्थानच्या नागौर लोकसभा मतदारसंघाचे खासदार बेनीवाल यांनी शेतकऱयांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा अगोदरच जाहीर केला आहे. बेनीवाल म्हणाले ,आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवे अन्यायकारक कृषी कायदे मागे घेण्याचे साकडे घातले असल्याचे बेनीवाल यांनी सांगितले.

























































