शिक्षकाला हनी ट्रॅपमध्ये अडकवून 23 लाख उकळले; मुख्य आरोपीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थानातील टोंक जिल्ह्यात हनी ट्रॅपची धक्कादायक घटना घडली आहे. एका सरकारी शाळेत असलेल्या शिक्षकाला हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याच्याकडून 23 लाख रुपये उकळण्यात आले आहे. शिक्षकाला ब्लॅकमेल करत त्याची बदनामी करण्याची भीती दाखवत महिन्याभरात 23 लाख रुपये उकळण्यात आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक केली आहे.

ही घटना टोंक जिल्ह्यातील मुबारक नगर गावात घडली आहे. येथील उच्च माध्यमिक शाळेत असलेल्या 55 वर्षांच्या शिक्षकाला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यात आले. एका फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी ते हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळी पिस्तूलचा धाक दाखवत त्यांचे फेसबुक फ्रेंडसोबत अश्लील व्हिडीओ बनवण्यात आले. हा व्हिडीओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत त्यांच्याकडून महिन्याभरात 23 लाख रुपये उकळण्यात आले.

या नेहमीच्या त्रासाल कंटाळून त्या शिक्षकाने 5 जुलै रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत कलीम उर्फ अमनसह शिक्षकाची फेसबुक फ्रेंड असलेल्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमन सवाई माधोपूरमधील आहे. हॉटेलमध्ये त्या महिलसह अमन आणि त्याचा मित्र होते. त्यांनी आपल्याला पिस्तूलचा धाक दाखवत आपले अश्लील व्हिडीओ चित्रीत केले. त्यानंतर आपल्याला नेहमी ब्लॅकमेल करत पैसे उकळण्यात येत होते. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी अमनला अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. त्यांनाही लवकरच अचक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.