
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
राजाबाजार परिसरातील पेंटचे दुकान व वाहनांची जाळपोळ केल्याच्या आरोपाखाली अटक केलेले युवासेनेचे उपसचिव नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांचा नियमित जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर येथील खंडपीठाचे न्यायमूर्ती संगीतराव पाटील यांनी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मंजूर केला.
मोहमद शोहेब अब्दुल मुनाफ (२८, राजाबाजार) यांच्या तक्रारीवरून राजेंद्र जंजाळ यांच्या विरोधात जिन्सी पोलीस ठाण्यात भादंवि १४७, १४८, १४९, ४३६, ४३५, ४२७ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. १५ मे रोजी शिवाजीनगर येथील घरातून त्यांना अटक करण्यात आली होती.न्यायालयाने त्यांना १८ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश झाले.त्यांनी नियमित जामीन मिळावा म्हणून अर्ज केला असता २१ मे रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी त्यांचा हा अर्ज फेटाळून लावला. त्यास राजेंद्र जंजाळ यांनी अॅड. राजेंद्र देशमुख यांच्यामार्पâत मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर येथील खंडपीठात आव्हान दिले असता जंजाळ यांच्या नियमीत जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. त्यानंतर खंडपीठाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्थ जामीन मंजूर केला. जंजाळ यांनी तपास अधिकाNयास वेळोवेळी सहकार्य करावे, साक्षीदारांवर दबाव आणू नये व या अटी, शर्तीचे उल्लंघन करू नये, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. अॅड. देशमुख यांना अॅड. निर्मल दायमा, अॅड. देवांग देशमुख, अॅड. आनंद कुलकर्णी यांनी सहकार्य केले.

































































