विनायक मेटेंना शह देण्यासाठी राजेंद्र मस्के भाजपमध्ये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, बीड

आमदार विनायक मेटे यांनी बीड जिल्ह्यात भाजपविरोधी भूमिका घेतल्यामुळे आता मेटेंना शह देण्यासाठी राजेंद्र मस्के आपल्या मित्रमंडळासह शुक्रवारी मुख्यमंत्र्याच्या उपस्थिती मध्ये भाजपा मध्ये प्रवेश करणार आहेत.

राज्यात महायुतीसोबत, महायुतीचे अजून दोन खासदार जास्त निवडून आणू, पण बीड जिल्ह्यात यांना झटका देऊ, असे म्हणत पंकजा मुंडेंवर तोफ डागणाऱ्या विनायक मेटे यांना शह देण्यासाठी राजेंद्र मस्के शुक्रवारी आपल्या मित्रमंडळासह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अंबाजोगाई येथे मुखमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश होणार आहे.