मातृवियोगाचे दु:ख दूर सारून राजेश टोपे कोरोनाच्या लढाईत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या संकटात पहिल्या दिवसापासून आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी सतत सक्रिय असणारे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आईच्या निधानाचे दुःख बाजूला ठेवत तीन दिवसातच पुन्हा कोरोनाच्या लढाईत उतरले. आरोग्य खात्याच्या बैठका घेत आजपासून ते पुन्हा सक्रिय झाले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदाताई यांचे शनिवारी मुंबईत निधन झाले. रविवारी जालना जिल्ह्यातील मूळच्या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यानंतर तीन दिवसात राजेश टोपे पुन्हा मुंबईत आले. मुंबईत येण्यापूर्वी मंगळवारी त्यांनी जालना जिल्ह्यातल्या अंबडमधील कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली. आज सकाळी मुंबईत आल्यावर त्यांनी आरोग्य खात्याच्या बैठका घेऊन कामाला सुरवात केली. पूर्वीच्या प्रथा बदलत काळासोबत चालणे गरजेचे आहे. त्यामुळे आईच्या निधनानंतर चौदा दिवसांचा दुखवटा न पाळता या काळातील विधी तीन दिवसात केले. आईने शेवटच्या काळात पाठीवर दोन्ही हात ठेवून आशिर्वाद दिला होता. त्याच आशिर्वादाच्या बळाकर पुन्हा जोमाने कोरोना विरुध्दच्या लढाईत उतरलो आहे, अशा शब्दात राजेश टोपे यांनी यावेळी भावना व्यक्त केल्या.