हिंदी विरोधात रजनीकांतचा आवाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाच्या प्रगतीसाठी संपूर्ण देशात एकच भाषा चालेलही, पण हिंदुस्थानसारख्या अनेकविध भाषा बोलल्या जाणाऱ्या देशामध्ये ते योग्य ठरणार नाही. तामीळनाडूत हिंदी किंवा दुसरी कुठलीही भाषा लादण्याचा प्रयत्न केला तर येथील लोक ती कदापि स्वीकारणार नाहीत, असे सांगत दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी बुधवारी ‘एक देश एक भाषा’ या मुद्दय़ाला कडाडून विरोध केला.

असे बोललोच नाही! 

देशात हिंदी भाषा सर्वाधिक बोलली जाते म्हणून ती राष्ट्रभाषा करावी असे मी बोललोच नव्हतो, असे सांगत भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सारवासारव केली. ‘मातृभाषेबरोबरच हिंदी भाषा शिकण्याची मी नम्र विनंती केली होती. मीसुद्धा गुजराती मातृभाषा असलेल्या राज्यातून आहे. पण काही लोक जर त्याचे राजकारण करू पाहत असतील तर त्यांची मजा’ असे सांगत त्यांनी हिंदी विरुद्ध इतर भाषांवरून सुरू असलेल्या वादावर पडदा टाकला.