रजनीकांत नवाजुद्दीनच्या पेट्टाचा नवीन पोस्टर जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

काला, 2.0 च्या यशानंतर रजनीकांतचा पेट्टा हा नवीन सिनेमा येत आहे. त्याचा नवीन पोस्टर जारी करण्यात आला आहे. आज चित्रपटाचा ऑडियो लाँच संपन्न झाला त्यानिमित्ताने सन पिक्चर्स या निर्मितीसंस्थेने पेट्टाचा नवीन पोस्टर प्रदर्शित केला आहे.

या चित्रपटात नवाझुद्दीन सिद्दिकी सुद्धा आहे. चार दिवसांपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याने या चित्रपटाचा आपला लूक शेअर केला होता.

चित्रपटात अभिनेत्रीच्या भुमिकेत त्रिशा दिसणार आहे. सुपरस्टार रजनीकांतसोबत काम करण्याचे आपले स्वप्न पुर्ण झाले अशी कॅप्शन देऊन त्रिशाने नवीन पोस्टर ट्विटरवर शेअर केला आहे.