
आयुष्यात 100 हून अधिक रेकॉर्ड्स मोडण्याचा चंग बांधलेल्या दुबईतील हिंदुस्थानी वंशाच्या रामपुमार सारंगपानी यांनी 17 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स केले आहेत. 18 नोक्हेंबर 2020 रोजी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड डेला सारंगपानी यांनी 7 तास 50 मिनिटांत सहा जागतिक विक्रम मोडले.
सर्वात मोठे मॅग्नेट सेन्टेन्स, सर्वात मोठा मॅग्नेट वर्ड, सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक ग्रिटिंग कार्ड (12 चौरस मीटर), सर्वात मोठा बंक नोट वर्ड (3,040 नोटा), सर्वात मोठे बॅंकनोट सेन्टेन्स (5,005 नोटा) आणि सर्वात छोटा पत्त्यांचा कॅट (7 मिमी x 5 मिमी x 4.86 मिमी) हे रेकॉर्ड केले.
मी जेव्हा सातवीत होतो, तेव्हा माझ्या एका नातेवाईकाने मला पहिले गिनीज बुक दाखवले. त्याचक्षणी मी गिनीज बुकाकडे आकर्षित झालो. आयुष्यात एकदा तरी आपले नाव त्या बुकमध्ये झळकावे, असे मला स्वप्न पडायचे. अशा प्रकारे सप्टेंबर 2017 मध्ये मी पहिल्यांदा सर्वात मोठी चुंबकाची चेन बनवण्याचा रेकॉर्ड केला, असे रामकुमार सांरगपानी याने सांगितले.





























































