
सामना ऑनलाईन । लखनौ
कश्मीरच्या मुद्दय़ावर प्रत्येकाशी चर्चा करायला केंद्र सरकार तयार आहे असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे सांगितले. ते लखनौ येथील सेंट्रल झोनल कौन्सिलच्या बैठकीसाठी आले असता पत्रकारांशी बोलत होते.
कश्मीरचा प्रश्न हमखास सुटू शकतो असा विश्वास करतानाच त्यासाठी प्रत्येकाशी चर्चा करण्याची आमच्या सरकारची तयारी आहे असे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी कश्मीर खोऱयातील दहशतवाद हा पाकिस्तान पुरस्कृत आहे असा स्पष्ट आरोपही त्यांनी केला.
























































