Rajasthan Political Crisis – भाजपने राजस्थानमधील 19 आमदारांना गुजरातला हलवले

2028

राजस्थानमध्ये उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडखोरी केल्यामुळे अशोक गेहलोत यांचे सरकार डळमळीत झाले आहे. काँग्रेसने आपले आमदार हॉटेलमध्ये ठेवले होते. आता भाजपनेही कुठला धोका न पत्करण्याचे ठरवले आहे. भाजपने आपले 19 आमदार गुजरातला हलवले आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आमच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

इकोनॉमिक टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. अशोक गेहलोत आमच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.  भाजपने आपल्या 72 आमदारांना 11 ऑगस्ट रोजी जयपुरच्या क्राऊन प्लाझा हॉटेलमध्ये बोलवले आहे. या हॉटेलमध्ये आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत भाजपचे मित्रपक्ष लोकतांत्रिक पक्षाचे तीन आमदारही या  बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधियाही उपस्थित राहतील.

भाजप आमदार गुलाब चंद कटारिया म्हणाले की सुरक्षेचा उपाय म्हणून काही आमदारांना गुजरातमध्ये ठेवण्यत आले आहे. आमचे आमदार पक्ष सोडतील अशी आम्हाला बिल्कूल भीती नाही पण काँग्रेसला कुठलीच संधी मिळून म्हणून त्यांना गुजरातमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच 19 आमदारांपैकी बहुतांश आमदार हे दलित आणि आदिवासी समाजाचे आहेत. काँग्रेस या समाजाच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपने केल आहे.

पण मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. तसेच्च भाजपमध्ये फूट पडली आहे. म्हणून त्यांनी आमदारांना गुजरातमध्ये पाठवले असल्याचे गेहलोत यांनी सांगितले.

 

आपली प्रतिक्रिया द्या