पुन्हा दिल्लीत घुसावे लागेल; बॅरिकेडस् तोडावे लागतील!  राकेश टिकेत यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱयांनी पुकारलेल्या आंदोलनाने शंभर दिवसांचा टप्पा पार केला तरी अद्याप हा प्रश्न निकाली निघालेला नाही. त्यामुळे शेतकऱयांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा धारण केला असून पुन्हा दिल्लीत घुसण्याचा निर्धार शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी व्यक्त केला. यासंदर्भातील ट्विट करत टिकेत यांनी वरील इशारा दिला असून पुन्हा एकदा दिल्लीत घुसावे लागणार असून बॅरिकेडस् तोडावे लागतील, असा निर्धार त्यांनी ट्विटच्या माध्यमातून दिला आहे.

राकेश टिकेत सध्या देशभरात अनेक ठिकाणी किसान महापंचायतच्या निमित्ताने शेतकऱयांना मार्गदर्शन करीत आहे. मंगळवारी जयपूर येथे आयोजित केलेल्या किसान महापंचायती दरम्यान टिकेत यांनी पुन्हा पेंद्र सरकारवर निशाणा साधला.

युवावर्गाने पुढे यावे

देशातील युवावर्गाला पुढे येण्याचे आवाहन करताना राकेश टिकेत म्हणाले की, देशभरात शेतकऱयांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात युवावर्गावर मोठी जबाबदारी आहे. त्यांनी पुढे येणे गरजेचे असून या लढाईत सहभागी होण्याची गरज आहे. देशात ज्यावेळी ‘जय श्रीराम’ आणि ‘जय भीम’च्या घोषणा एकत्र लागतील तेव्हा हा देश वाचेल, अन्यथा हा देश लुटला जाईल, असे भाकीतदेखील त्यांनी यावेळी वर्तविले.