
सामना प्रतिनिधी । कुडाळ
अनुगामी लोकराज्य महाअभियान या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून व पावशी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने एक राखी सैनिकांसाठी हा आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत पावशी गावातून सुमारे एक हजार राख्या संकलित करण्यात आल्या असून त्या सिमेवरील सैनिकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत.
सिंधुदुर्गात यंदा प्रथमच असा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पावशी गावातील विभागवार प्रत्येक घरातून राख्या संकलित करण्यात आल्या. या उपक्रमात सिंधुदुर्ग – रत्नागिरीचे उपविभाग प्रमुख स्वप्नील सावंत, कुडाळचे जितेंद्र चिकोडी, महेश दळवी, अमित नाईक यांनी सहभाग घेतला. त्यांना आरएसएसचे विभाग प्रचारक निलेश मुळीक यांची या उपक्रमासाठी प्रेरणा मिळाली. यावेळी पावशीचे सरपंच भिकाजी (बाळा) कोरगांवकर, उपसरपंच दिपक आंगणे, ग्रा.पं.सदस्या यशश्री तेली, सागर भोगटे, प्रसाद शेलटे आदींसह ग्रा.पं.कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.































































