डब्ल्यूडब्ल्यूईच्या रिंगमधला राखीचा डान्स पाहिलात का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मंडी

आयटम गर्ल राखी सावंत प्रसिद्धीसाठी कधी काय करेल ते सांगता येत नाही. सध्या राखीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात चक्क ती डब्ल्यूडब्ल्यूईच्या रिंगमध्ये डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओत बिग बॉस फेम सपना चौधरी देखील तिच्यासोबत नाचताना दिसत आहे.

हा व्हिडीओ डब्ल्यूडब्ल्यूई रिंगमधला असला तरी तो परदेशातील नसून हरयाणातील मंडी गावातल्या जत्रेतला आहे. या जत्रेत कुस्तीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी लोकांची गर्दी व्हावी म्हणून राखी सावंत आणि सपना चौधरीचे डान्स ठेवण्यात आले होते. या दोघींना डब्ल्यूडब्ल्यूईच्या रिंगमध्ये तुफान डान्स करत लोकांचे चांगलेच मनोरंजन केले.