राखी सावंतने केले एग फ्रिज, नवरा नाही आला तर लवकरच घेणार निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूडची आयटम गर्ल राखी सावंत ही कायम काही ना काही वादग्रस्त गोष्टींमुळे चर्चेत असते. राखी गेल्या वर्षी रितेश नावाच्या व्यक्तीसोबत लग्नबंधनात अडकली. राखीचा हा रितेश अद्याप जगासमोर आलेला नाही. राखीने बिग बॉस मध्येही अनेकदा रितेशचा उल्लेख केला मात्र तो परदेशातून तिला भेटायला येत नसल्याने ती निराश असल्याचे सांगितलेले.

rakhi-sawant

राखीने तिला आई व्हायची इच्छा असल्याचे बिग बॉसमध्ये बोलून दाखवले होते. मात्र रितेश मुंबईत आल्यावर ते दोघे बेबी प्लान करतील असे तिने जाहीर केलेले. मात्र रितेश येतच नसल्याने तिने आता तिचे एग्ज फ्रिज केले आहेत. जर लवकरच रितेश परत नाही आला ती भविष्यात या एग्जचा वापर करून आई होऊ शकते.

rakhi-sawant

‘अनेक महिला मासिक पाळी व फायब्रॉईड्सचा त्रास सहन करत असतात. त्यामुळे त्यांना गरोदर राहायला त्रास होतो. एका वयानंतर आई होणं कठिण होतं. त्यामुळे अंड फ्रिज करणं हा चांगला ऑप्शन आहे. मला बॉलिवूडमध्ये काम करायचे आहे. त्यामुळे मी अंड फ्रिज केलं आहे’ असे राखीने सांगितले.

rakhi-sawant-new-bride

मोना सिंगने 34 व्या वर्षी फ्रिज केले एग्ज 

जस्सी जैसी कोई नही या मालिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री मोना सिंह हिने गेल्या वर्षी वयाच्या 39 व्या वर्षी लग्न केले. मोनाने वयाच्या 34 व्या वर्षीच तिची स्त्री बीजं (अंड) फ्रिज करून ठेवली आहेत.  ‘मी माझे स्त्री बीज फ्रिज करून ठेवली आहेत. त्यामुळे आता मी एकदम आझाद आहे. वयाच्या 34 व्या वर्षी मी हे केलेलं. आता मला माझ्या पार्टनरसोबत खूप वेळ घालवायचा आहे, जग फिरायचं आहे’, असे मोना सिंहने सांगिंतलेले

mona

एग फ्रीझिंग म्हणजे काय?

– यात महिलेला दहा दिवस हार्मोन्सचे इंजेक्शन घ्यावे लागते.
– त्या इंजेक्शनमुळे महिलेच्या शरीरात ती अंडी तयार होतात.
– नंतर ऍनेस्थेशिया देऊन महिलेच्या शरीरातून ती अंडी बाहेर काढली जातात. या प्रोसेसला फक्त पंधरा मिनिटांचा वेळ लागतात व दोन तासांनी ती घरी निघून जाते.
–  ती अंडी गोठवली जातात
– त्यानंतर त्या महिलेवर अवलंबून असते तिला कधी बाळाचा विचार करायचा.

पुढची प्रक्रिया काय?

स्त्री जेव्हा मातृत्वासाठी तयार होते तेव्हा हे गोठवलेले बीज आणि पुरुषाचा शुक्राणू घेऊन परीक्षानळीत स्त्री बीज आणि शुक्राणूचा संयोग घडवून आणला जातो आणि त्यातून गर्भाची निर्मिती केली जाते. हा गर्भ या परीक्षानळीतच तीन दिवस वाढवला जातो आणि स्त्रीच्या गर्भाशयात गादी तयार केली जाते. त्यानंतर गर्भाचे रोपण केले जाते. गर्भ मातेच्या गर्भात वाढून प्रसूती होते.