Rakul-Jackky Wedding: लग्नासाठी रकुल- जॅकी भगनानी पोहोचले गोव्याला, व्हिडीओ होतोय व्हायरल

सध्या बॉलीवूडमध्ये लगीनसराईचे दिवस सुरु आहेत. बी टाऊनच्या कपल्समध्ये आता रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांच्या नावाचाही समावेश झाला आहे. हे लव्ह बर्ड काही दिवसातच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. रकुल-जॅकी यांची लग्नाची जय्यत तयारी सुरु आहे. हे जोडपं लग्नाचे फेरे गोव्यात घेणार असल्याने हे जोडपं आज गोव्याला पोहोचले आहे. सोशल मीडियावर त्यांचा गोव्याच्या विमानतळावरील फोटो व्हायरल होत आहे.

रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांच्या प्रेमकहाणीची सुरुवात लॉकडाऊनच्या काळात सुरु झाली होती आणि तेव्हापासून हे जोडपं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसत आहे. 21 फेब्रुवारी रोजी हे जोडपं लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. यांच्या लग्नात अनेक बॉलीवूड सेलीब्रिटीजची उपस्थिती असणार आहे. रकुल आणि जॅकीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये दोघंही गोव्याला पोहोचल्याचे दिसत आहेत. जिथे रकुलने केशरी रंगाची पॅण्ट आणि केशरी रंगाच्या कोटसोबत गुलाबी रंगाचा बिकिनी ब्लाऊजमध्ये दिसत आहे. तर जॅकीने  शर्ट आणि पॅण्टमध्ये दिसत आहे. रकुल आणि जॅकीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते गोव्याच्या विमानतळावर दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांच्या लग्नाचे खास फोटो कोणीही कॅप्चर करू नयेत याची खबरदारी म्हणून जोडपे कतरिना कैफ आणि विकी कौशल सारखे ‘नो फोन पॉलिसी’ स्वीकारतील. पाहुणे आल्यानंतर त्यांना त्यांचे फोन सिक्युरिटीकडे सोपवावे लागतील.रकुल आणि जॅकी अधिकृतपणे त्यांच्या अकाउंटवर लग्नाचे फोटो शेअर करतील.