‘लव्ह जिहाद’विरोधात नगरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात दिवसेंदिवस वाढत चालेल्या ‘लव्ह जिहाद’च्या घटनांच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने नगर शहरात मोर्चा काढण्यात आला. ‘जय भवानी जय शिवाजी’ व ‘जय श्री राम’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

नगर शहरातील जुन्या बसस्थानकाजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला व मार्केट यार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर या मोर्चाची सुरुवात झाली. माळीवाडा, आशा टॉकीज चौक, कापड बाजार, तेलीखुंट, चितळे रोड मार्गे दिल्लीगेट या ठिकाणी हा मोर्चा आला. दिल्ली गेट या ठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. मोर्चात महिलांचीही गर्दी मोठय़ा प्रमाणावर दिसून आली.

भगव्या टोप्या, भगवे पंचे तसेच भगव्या ध्वजांमुळे सगळीकडे भगवेमय वातावरण झाले होते. यावेळी काजल हिंदुस्थानी, कालीचरण महाराज, दिगंबर गेंटय़ाल, बापूसाहेब ठाणगे, शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, सुवेंद्र गांधी, माजी महापौर सुजाता कदम, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख आशा निंबाळकर, माजी महापौर अभिषेक कळमकर व भगवान फुलसौंदर, नगरसेवक गणेश कवडे, भाजपचे अभय आगरकर, सागर ठोंबरे, नितीन गंगेकर, देविदास मुदगल, सचिन पळशीकर, अभिमन्यू जाधव, रुद्रेश अंबाडे आदींसह अनेकजण उपस्थित होते.

सोलापूर जिल्हा परिषदेसमोर निदर्शने

 ‘लक्ह जिहाद’ला रोखण्यासाठी स्कतंत्र आणि कठोर कायदा करण्यात याका, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आला. हिंदू जनजागृती समितीच्या महिला शाखेच्या कतीने छत्रपती सोलापूर जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी अलका क्हनमारे, राजन बुणगे, दत्तात्रय पिसे, धनंजय बोकडे, सूरज मदनाकाले उपस्थित होते.