
साउथ इंडस्ट्रीचा गाजलेला अभिनेता चिरंजीवी यांचा मुलगा सुपरस्टार राम चरण फेब्रुवारीच्या सुरुवातीला जुळ्या मुलांचा पिता झाला. त्याची पत्नी उपासना कोनिडेला हिने एक मुलगी आणि मुलाला जन्म दिला. हा क्षण संपूर्ण कुटुंबासाठी प्रचंड आनंदाने भरलेला होता. याआधी राम चरण आणि उपासना कोनिडेला यांनी 2 वर्षांपूर्वी मुलीला जन्म दिला होता आता राम चरण आणि उपासना कोनिडेला दोन मुली आणि एका मुलगा असे आपत्य आहेत.
राम चरण आणि उपासना यांनी अलीकडेच एका मुलाखतीत बोलताना त्यांच्या जुळ्या मुलांची नावे उघड केली आहेत. तसेच या जोडप्याने नावांसह त्यांचे अर्थ देखील सांगितले राम चरण यांनी मुलाचे नाव शिवराम आणि मुलीचे नाव अनवीरा देवी ठेवले आहे. त्यांनी पुढे सांगितले, आमच्या मुलाचे नाव शिवराम हे दोन शाश्वत आदर्शांचा संगम आहे. भगवान शिव आणि भगवान राम जे संयमासह शक्ती आणि धार्मिकतेसह भक्तीचे प्रतीक आहेत. तसेच हे माझ्या वडिलांचे जन्म नाव ‘शिव शंकर’ ला पुढे नेत आहे. तसेच राम चरण मुलीच्या नावाबद्दल बोलताना म्हणाला की, अनवीरा देवी या नावाचा एक विशेष अर्थ आहे. अनवीरा देवी हे नाव धैर्य आणि स्त्री शक्तीचे प्रतीक आहे. ‘अन’ ते अनंततेपर्यंत आणि ‘वीरा’ शौर्य दर्शवते. ‘देवी’ हा शब्द जाणूनबुजून जोडण्यात आला आहे जेणेकरून आपल्याला आठवण होईल की शक्ती आणि करुणा एकत्र राहू शकतात. आमच्यासाठी, ही नावे केवळ ओळख नाहीत, तर आमच्या मुलीसाठी ही एक इच्छा आणि प्रार्थना आहे की ती नेहमीच धैर्यवान, प्रेमळ आणि बलवान राहावी.




























































