मी दाऊदचा आभारी आहे! रामगोपाल वर्मा बरळले

अनेकदा ट्विट आणि विधानामुळे वाद ओढवून घेणारे दिग्दर्शक रामगोपाल वर्मा पुन्हा बरळले आहेत. आता त्यांनी थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे आभार मानले आहेत. रामगोपाल वर्मा यांचा नवा सिनेमा ‘डी कंपनी’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यातून मुंबईतील गँगस्टर्सची कहाणी पुन्हा मोठय़ा पडद्यावर बघायला मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर वर्मा यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत आले आहे.

‘स्पॉटबॉय’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, मी दाऊदचा आभारी आहे. मी गँगस्टर्सवर सिनेमा बनवून माझे करियर केले. पण खरं सांगायचं तर मला माणसाच्या काळ्या बाजूमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. ‘डी कंपनी’ सिनेमातून काही सच्च्या पैलूंवर प्रकाश टाकणार असल्याचे वर्मा यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या