आता नेपाळमध्येही बनणार राम मंदिर, पंतप्रधान ओलींनी दिले निर्देश

980
ram-mandir

5 ऑगस्ट रोजी अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर भूमीपुजनाचा कार्यक्रम पार पडला. लवकरच राम जन्मभूमीवर भगवान रामाचे भव्य मंदिर उभे राहील. अयोध्येच्या पार्श्वभुमीवर नेपाळमध्येही राम मंदिर बनणार आहे. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी तसे निर्देश दिले आहेत.

राम मूळचे नेपाळचे आहेत असा दावा काही दिवसांपूर्वी पंतप्रधान ओली यांनी केला होता. आता तेवढ्यावरच न थांबता त्यांनी राम मंदिर बनवण्याची तयारी केली आहे. त्यासाठी त्यांनी नेपाळच्या लोकप्रतिनिधींशी चर्चाही केली आहे.

नेपाळची सरकारी वृत्तसंस्था राष्ट्रीय समाचार समितीने दिलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान ओली यांनी ठोरी आणि माडी या भागातील लोकप्रतिनिधींना राजधानी काठमांडूत बोलावून घेतले. तसेच या भागात भगवान रामाचे भव्य मंदिर बनवण्यासाठी आवश्यक तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ठोरी भागातील माडी नगरपालिकेचे नाव बदलून अयोध्यापूरी करण्याचे आदेश दिले आहे. तसेच या भागातील जमी अधिग्रहण करून मोठे राम मंदिर बांधावे राम लक्ष्मण आणि सीतेचे मोठी मूर्ती स्थापन करण्याचे आदेश ओली यांनी दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या