
अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर बनावे यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार केंद्र सरकारने एका ट्रस्टची स्थापना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये याची घोषणा केली. यानंतर माजी खासदार आणि काँग्रेस नेते उदित राज यांनी एक असे ट्वीट केले ज्यावरून काँग्रेसमध्ये घमासान सुरू झाले आहे.
‘हिंदुस्थानमध्ये गेल्या वेळेस झालेल्या जनगणनेनुसार दलितांची लोकसंख्या ब्राह्मणांपेक्षा तीन पट जास्त आहे. मग सरकारने राम मंदिराचे निर्माण फक्त ब्राह्मणांच्या हाती कसे सोपवले. सरकार बेईमानी करत आहे’, असे ट्वीट उदित राज यांनी केले आहे. या ट्वीटनंतर काँग्रेस प्रवक्ते राजीव त्यागी यांनी उदित राज यांना यावर चर्चा करण्याचे खुले आव्हान दिले आहे, तसचे माजी केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद यांनी उदित राज यांच्यावर आगपाखड केली आहे.
राजीव त्यागी यांचे आव्हान
उदित राज यांना काँग्रेसमधील ब्राह्मण नेत्यांनी लक्ष्य केले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव त्यागी यांनी उदित राज यांचे ट्वीट रिट्वीट करून त्यांना चर्चेचे खुले आव्हान दिले आहे. ब्राह्मण असणे पाप नाही. माझे यावर खुले आव्हान आहे की कोणत्याही व्यक्तीने यावर चर्चा करावी, असे ट्वीट राजीव त्यागी यांनी केले.
ब्राह्मण होना पाप नहीं। मेरी चुनौती है कि कोई भी व्यक्ति इस विषय पर बहस कर ले। https://t.co/Naw3IucVyY
— Rajiv Tyagi (@RTforINC) February 6, 2020
जितीन प्रसाद यांची आगपाखड
जितीन प्रसाद यांनी उदित राज यांना काँग्रेसच्या परंपरांची आठवण करून दिली. कोणताही विषय असो, कोणत्याही जातीवर हल्ला चढवणे काँग्रेसची परंपरा नाही, असे ट्वीट त्यांनी केले आहे.
जो भी विषय हो , कांग्रेस की परंपरा किसी भी जाति या समुदाय पर प्रहार करने की नहीं है।मेरा मानना है कि कांग्रेस की नीति अनुसूचित जातियों के पक्ष में विशेष सकारात्मक प्रावधानों के साथ सभी के लिए समान अवसर की है। https://t.co/UptuG1Sxq1
— Jitin Prasada (@JitinPrasada) February 7, 2020
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयामध्ये राम मंदिर निर्माणासाठी प्रखरतेने बाजू मांडणारे ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ के परासरन बे श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य असणार आहेत. याशिवाय या ट्रस्टमध्ये पुण्याचे गोविंद देव गिरी, अयोध्येतील डॉक्टर अनिल मिश्रा , निर्मोही आखाड्याचे धीरेंद्र दास हे देखील सामील असणार आहेत.
राम मंदिरासाठी आंदोलन केलेल्यांना सरकार विसरले! ट्रस्टमध्ये स्थान न मिळाल्याने संत-महंत भडकले




























































