
अयोध्येत 22 मार्च रोजी राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. संपूर्ण देशभरातून सध्या भाविक रामाचे दर्शन घ्यायला येत आहेत. या भाविकांकडून मंदिराला मोठ्या प्रमाणात दान मिळत आहे. देशातून नाही तर परदेशातून देखील ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दान दिले जात आहे.
राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतरच्या पहिल्याच दिवशी 2 कोटी 90 लाख, दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 जानेवारी रोजी 2 कोटी 43 लाख, 25 जानेवारी रोजी 8 लाख 50 हजार, तर प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारीला 1 कोटी 15 लाख रुपये दान म्हणून मिळाले. असे 4 दिवसात एकूण 7 कोटी 8 लाख रुपये जमा झाले आहेत.
राम मंदिर ट्रस्टकडून दिलेल्या माहितीनुसार 27 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत 75 हजार भाविकांनी रामलल्लांचे दर्शन घेतले होते. 22 जानेवारी रोजी मोदींच्या हस्ते अयोध्येत अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मंदिर सर्वसामान्य भक्तांसाठी खुले करण्यात आले. तेव्हापासून भाविक मोठ्या संख्येने रामलल्लाच्या दर्शनासाठी येत आहेत.

























































