रमादेवींनी तडकावले, आझम खान यांचा लोकसभेत माफीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

तिहेरी तलाख विधेयकावरील चर्चेदरम्यान लोकसभेत महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱया सपा खासदार आझम खान यांनी अखेर सोमवारी सकाळी सभागृहाचे कामकाज सुरू होताच माफी मागितली. त्यानंतर भाजप खासदार रमादेवी यांनी, आझम हा बिगडेल माणूस आहे. सभागृहाबाहेरही त्यांचे वर्तन नेहमीच वादग्रस्त आहे. आता तरी बोध घेऊन त्यांनी वर्तन सुधारावे, अशा शब्दात आझम खान यांना तडकावले.

भाजप खासदार रमादेवी या तालिका अध्यक्ष म्हणून सभागृहाचे कामकाज पाहत असताना आझम खान यांनी रमादेवी यांना उद्देशून केलेल्या वक्तव्याबाबत सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत होता. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी देखील सपा खासदार खान यांना समज देत माफी मागण्याचे निर्देश दिले होते. यासंदर्भात गेल्या आठवडय़ात बोलविण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीतही असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर माफी मागणार नाही, अशी भूमिका यापूर्वी घेणाऱया खान यांनी अखेर माफी मागितली.

अध्यक्षांच्या भावना दुखावण्याचा यामागे माझा अजिबात हेतू नक्हता. तरीही माझ्याकडून काही चूक झाली असे त्यांना काटत असेल तर मी त्याबाबत क्षमा मागतो, असे सांगितले. मात्र, सत्ताधारी सदस्यानी, गोंधळात माफी ऐकायला आली नाही, अशी ओरड करताच अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आझम यांना दुसऱयांदा माफी मागावी लागली. लोकसभा हे देशातील सर्वांचे सभागृह आहे. प्रत्येकाच्या पाठिंब्यावर ते चालते. सभागृहाचा अवमान होईल, असे कोणतेही वक्तव्य कोणत्याही सदस्याने करू नये, अशी ताकीद ओम बिर्ला यांनी दिली.

आझम हा बिगडेल माणूस
आझम खान हा बिगडेल माणूस आहे. त्यांचे वर्तन हे नेहमीच सभागृहात आणि बाहेर वादग्रस्त ठरले आहे. मी एका सामान्य कुटुंबातून संघर्ष करत करत इथवर पोहचले आहे. ती आझम यांची अश्लाघ्य भाषा ऐकण्यासाठी नाही. त्यांनी माझाच नाही तर देशातील स्त्री-पुरुषांचा अपमान केला आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे देशाच्या प्रतिमेला आणि लोकशाहीला धक्का बसला आहे. त्यामुळे आझम खान यांनी आता तरी स्वतःत सुधारणा घडवून आणावी, असा टोला रमादेवी यांनी लगावला.