रामायण-महाभारतपुढे शाहरुखची जादू ओसरली! सलग दुसऱ्या आठवड्यातही टॉपवर

10583
काही दिवसांपासून रामायण आणि महाभारत या गाजलेल्या मालिका पुन्हा सुरू झाल्या. या मालिकांसोबतच अनेक मालिका पुन्हा दाखवण्यात येत आहेत.

रामायण आणि महाभारत या दूरदर्शनवरील पौराणिक मालिकांपुढे बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची देखील जादू फिकी पडली आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत रामायण मालिकेला सर्वाधिक 759 मिलियन तर महाभारत मालिकेला 228 मिलियन व्ह्युज मिळाले आहेत. तरी याच वाहिनीवरील शाहरुखच्या सर्कस या मालिकेला केवळ 2.1 मिलियन व्ह्युजवर समाधान मानावे लागले आहे.

लॉकडाऊनच्या काळात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी दूरदर्शन वाहिनीने रामायण महाभारतसह सर्कस, बुनियाद, जंगल बुक, श्रीमान श्रीमती, देख भाई देख या मालिकांचे पुनःप्रसारण करण्याचा निर्णय घेतला होता. आकडेवारीनुसार रामायण आणि महाभारत या मालिकांमुळे सलग दुसर्‍या आठवड्यातही दूरदर्शन वाहिनी टीआरपीच्या बाबतीत नंबर एकवर आहे. मुकेश खन्ना यांच्या शक्तिमान मालिकेला 37 मिलियन तर चाणक्य या मालिकेला 17 मिलियन व्हयुज मिळाले आहेत. बच्चे कंपनीच्या आवडत्या द जंगल बुकला 5.6 मिलियन तर रमेश सिप्पी यांच्या बुनियाद मालिकेला 3.5 मिलियन व्हयुज मिळाले आहेत. तर डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी मालिकेला 4.4 मिलियन प्रेक्षकांनी पाहिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या