विधानसभा निवडणुकीसाठी रामदास आठवले यांची 10 जागांची मागणी

ramdas-athawale

आम्ही महायुतीत घटक पक्ष आहोत. त्यामुळे राज्यातील विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षाने 10 जागांची मागणी भाजपकडे केली आहे, अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे नेते, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे केली आहे.

मुंबईतील चेंबूर, मानखुर्द-शिवाजीनगर, धारावी, कुर्ला, वेसावे. चांदिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, कर्जत-खालापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, नाशिक-देवळाली, श्रीरामपूर, भुसावळ, चाळीसगाव, भंडारा, चंद्रपूर, पांढरकवडा, बडनेरा, केज, उदगीर, गंगाखेड, पिंपरी, पुणे कॅण्टोन्मेंट, माळशिरस, फलटण अशा 26 जागांमधून 10 जागांची मागणी आठवले यांनी भाजपकडे केली आहे. आगामी निवडणूक आमचे उमेदवार भाजपच्या निवडणूक चिन्हावर नव्हे तर स्वतःच्या पक्षाच्या चिन्हावर लढविण्यात येतील असेही त्यांनी म्हटले आहे.

अयोध्येत राममंदिराचे निर्माण होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागेल, असे आठवले यांनी सांगितले. तसेच हिंदुस्थानी खेळांमध्ये अनुसूचित जाती- अनुसूचित जमातींसाठी आरक्षण ठेवण्यात यावे, अशी मागणी आठवले यांनी केली आहे. केंद्र सरकारपुढे देशातील आर्थिक मंदीचे आव्हान मोठे असले तरी यातून मोदी सरकार यशस्वी मार्ग निश्चितपणे काढील, असा दावाही आठवले यांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या