रामदेवबाबांचे सहकारी आचार्य बालकृष्ण ‘एम्स’मध्ये दाखल

515

योगगुरू रामदेवबाबा यांचे सहकारी आणि ‘पतंजली आयुर्वेद’चे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आचार्य बालकृष्ण यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले होते, मात्र अन्नातून विषबाधा झाल्याने रुग्णालयात दाखल केल्याची माहिती रामदेवबाबांचे प्रवक्ते एस. के. तिजारावाला यांनी सांगितले. आचार्य बालकृष्ण यांना सुरुवातीला हरिद्वारच्या भूमानंद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती अधिक बिघडल्याने ऋषिकेशच्या एम्समध्ये दाखल केले. दुपारी पतंजलीच्या बहाराबाद येथील कार्यालयात असताना त्यांची प्रकृती बिघडली. दरम्यान, बालकृष्ण यांची प्रकृती स्थिर असून रक्तदाब, ईसीजी, इको आदी रिपोर्ट नॉर्मल असल्याचे रुग्णालयाने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या