रणजी क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या लढतींना शनिवारपासून सुरुवात झाली. सौराष्ट्राने पहिल्या दिवशी 5 बाद 217 धावा फटकावल्या. शेल्डॉन जॅक्सनने नाबाद 69 धावा करीत सौराष्ट्रासाठी मोलाची भूमिका बजावली, पण इतर फलंदाजांना ठसा उमटवता आलेला नाही. गुजरातकडून अर्झान नागवासवल्लाने 3 व अक्षर पटेल याने 2 फलंदाज बाद केले.
शतकवीर मजुमदारने डाव सावरला
बंगाल व कर्नाटक यांच्यामधील उपांत्य फेरीच्या लढतीलाही शनिवारपासून सुरुवात झाली. कर्नाटकने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. इतर फलंदाज अपयशी ठरत असतानाच अनुस्तुप मजुमदार याने नाबाद 120 धावांची खेळी साकारत बंगालचा डाव सावरला. बंगालने 9 बाद 275 धावा तडकावल्या. अभिमन्यू मिथुनने 3 फलंदाज बाद केले.
– चेतेश्वर पुजारा हा सौराष्ट्रासाठी 12 व्या खेळाडूची भूमिका बजावत आहे. न्यूझीलंड दौऱयात हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करीत असला तरी तो तेथून कर्णधार जयदेव उनाडकटसोबत लढतीशी निगडित चर्चा करीत आहे.



























































