रणबीर कपूरने विजय देवरकोंडाचा विषय काढताच रश्मिका लाजली

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा हे एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या वावड्या गेले अनेक महिने उडत आहेत. या दोघांनी एकत्र चित्रपट केले असून पडद्यावरील या दोघांची केमिस्ट्री खूप लोकांना आवडली आहे. सध्या रश्मिका अ‍ॅनिमल नावाच्या चित्रपटात काम करत असून तिच्यासोबत रणबीर कपूरही या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत आहे. एका टॉक शोमध्ये रणबीरने रश्मिकासमोक विजय देवरकोंडाचा विषय काढला. यामुळे रश्मिका आणि विज देवरकोंडा हे एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या वावड्यांना आणखी बळ मिळाले आहे.

दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्यासह ‘अ‍ॅनिमल’चित्रपटाचे सह-कलाकार नुकतेच अभिनेता नंदामुरी बालकृष्णा हे सूत्रसंचालन करत असलेल्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते.  संभाषण सुरू असताना रश्मिकाच्या नात्याचा विषय चर्चेत आला आहे. यादरम्यान विजय देवरकोंडावरही चर्चा सुरू झाली. तेव्हा नंदामुरी बालकृष्ण यांनी ‘अर्जुन रेड्डी’ आणि ‘अ‍ॅनिमल’चे पोस्टर दाखवले आणि संदीप आणि रश्मिकाला या दोन चित्रपटांपैकी एक निवडण्यास सांगितले.

तेव्हा रणबीर म्हणाला की, यापैकी एक निवडा. यानंतर तो स्वत:कडे बोट दाखवत म्हणाला, ‘रील हिरो’ किंवा विजयकडे बोट दाखवत म्हणाला, ‘रियल हिरो?’ तर दुसरीकडे कार्यक्रमाचे सूत्रसंचालक नंदामुरी यांनी संदीपला विजयला फोन करायला सांगितले. रणबीर म्हणाला, ‘सर, रश्मिकाला कॉल करू द्या, विजय संदीपच्या कॉलला उत्तर देणार नाही.’ रणबीरने पुढे म्हटले की विजयचे नाव फोनवर दाखवू नका. यानंतर रश्मिकाने विजयला फोन केला मात्र त्याने तो उचलला नाही. थोडावेळाने संदीप यांनी केलेल्या कॉलला विजयने प्रतिसाद दिला आणि फोन केला, यावेळी संदीप यांनी त्यांच्या हातातला फोन रश्मिकाकडे दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by virosh <3 🖤🤍 (@virosh_trends)

विजयने तिचा ऐकून तिला विचारलं की , ‘काय चाललंय?’ यावर रश्मिकाने विजयला सांगितले की  फोन स्पीकरवर आहे.  यानंतर रश्मिकाला ‘अ‍ॅनिमल’ आणि ‘अर्जुन रेड्डी’च्या पोस्टरमधून आवडत्या पोस्टरची निवड करण्यास सांगितले जाते. यावर हे दोन्ही चित्रपट मला आवडतात’, असे रश्मिकाने सांगितले.

रश्मिकाच्या उत्तरवर तिला उलटा प्रश्न विचारण्यात आला की, ‘अर्जुन रेड्डीशी तुझा काय संबंध?’ याचे उत्तर कसे द्यावे हे रश्मिकाला कळले नाही आणि ती लाजली. यावरून रश्मिका आणि विजय हे दोघे प्रेमात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.