रांगोळीतून साकारल्या दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाच्या छटा

कांजूरमार्ग येथील संस्कृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित रांगोळी प्रदर्शनातून ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाच्या छटा मांडल्या आहेत. प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार सुनील राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी बाबा कदम, ट्रेवर मार्टीस, सुधाकर पेडणेकर, दीपक सावंत, सचिन चोरमुले, शैलेश तारकर, प्रदीप पवार, संतोष पासलकर, अभिलाष पवार, संतोष गोनभरे, अभय खानविलकर, अमित प्रभू, रसिक हडकर, विशाल सारंग आदी उपस्थित होते.