रांजणी येथे विलगीकरण कक्षासाठी सरस्वती भुवन हायस्कूलची पाहणी

327

कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर भविष्यात कोरोना संशयितांची संख्या वाढल्यास जालना जिल्ह्यातील घनसांवगी तालुक्यातील रांजणी येथे विलगीकरण कक्ष स्थापण करण्यासाठी उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल आणि तहसीलदार गौरव खैरनार यांनी शनिवारी रांजणी येथील श्री सरस्वती भुवन हायस्कूलची पाहणी केली. कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधासाठी शासन व प्रशासन सतर्क झाले आहेत.

सेविका, आशा यांच्यामार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहे. त्यांच्याकडून काही संशयित आढळल्यास तालुका आरोग्य विभागाच्या पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे. घनसावंगी तालुक्यात 20 विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. घनसावंगी तालुक्यात कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांचे अंगणवाडी सेविका, आशा यांच्या मार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. काही संशयित आढळल्यास तालुका आरोग्य विभागाच्या पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे. रुग्णांची संख्या वाढल्यास जिल्हा कार्यालयाच्या वतीने 3 हजार 600 नागरिकांचे विलगीकरण होईल असे उद्दिष्ट दिले होते, त्यानुसार तालुक्यातील मंडळ निहाय तीर्थपुरी, घनसावंगी, कुंभार पिंपळगाव, रांजणी, राणीउंचेगाव यासह इतर 22 ठिकाणी असे विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. येथे कोरोना संशयित जवळपास 2 हजार 776 नागरिकांची सोय होईल असा प्रयत्न आहे. विलगीकरण कक्ष स्थापण करण्यासाठी शनिवारी उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल आणि तहसीलदार गौरव खैरनार यांनी रांजणी येथील श्री सरस्वती भुवन हायस्कूलची पाहणी केली. यावेळी मंडल अधिकारी बी.एल. काळे, तलाठी विठ्ठल उफाड, प्रेम भारती, कृषि सहाय्यक अमोल कोल्हे, स.भु. हायस्कूलचे कार्यालय अधीक्षक बंडेराव देशमुख, राधाकिसन शिंगणे, बंडू गाढे, अनिल लगामे, ज्ञानेश्वर आढाव, सचिन जैवळ, गजानन देशमुख आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या