
सामना ऑनलाईन । नागपूर
गतविजेत्या विदर्भाने रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी सौराष्ट्रावर विजय मिळवत चषकावर पुन्हा एकदा नाव कोरले आहे. पहिल्या डावात 5 धावांची आघाडी घेणाऱ्या विदर्भाने दुसऱ्या डावात 92.5 षटकांत 200 धावा करून सौराष्ट्रापुढे विजयासाठी 206 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, विदर्भाच्या आदित्य सरवटे आणि अक्षय वाखरे यांच्या फिरकी आक्रमणासमोर सौराष्ट्राचा दुसरा डाव अवघ्या 127 धावांत संपुष्टात आला. विदर्भाने 78 धावांनी सौराष्ट्रावर मात केली.
Vidarbha Won by 78 Run(s) (Winners) #VIDvSAU @paytm #RanjiTrophy #Final Scorecard:https://t.co/J0U6yB7u1Z
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 7, 2019
डावखुरा फिरकीपटू आदित्य सरवटेने पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात सहा फलंदाजांना माघारी धाडले. अक्षय वाखरेनेही पहिल्या डावात चार आणि दुसऱ्या डावात तीन बळी घेऊन सौराष्ट्राच्या फलंदाजांना माघारी धाडले.
दरम्यान, सलग दोन वेळा रणजी चषकावर आपले नाव कोरणाऱ्या विदर्भाच्या संघांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


























































