
सामना ऑनलाईन, मुंबई
काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. आमदारकी-खासदारकीसाठी पक्षात आलेलो नाही.माझ्या मातीची तहान भागविण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली. निबांळकर यांना भाजपतर्फे माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.
मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत निंबाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी चंद्रकांत पाटील, सुभाष देशमुख, गिरीश महाजन, रणजितसिंह मोहिते पाटील आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आता माढा तर शंभर टक्के जिंकणारच, पण सोलापूर, साताऱ्याच्या जागेचेही आता काहीच प्रॉब्लेम उरला नाही.
पवारांचा यू टर्न बरा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेबांबद्दल आम्हाला आदर आहे.पण माढय़ाबाबत त्यांनी ‘ऍक्सीडेंट होण्यापेक्षा यूटर्न घेतलेला बरा’हा योग्य निर्णय घेतल्याचा टोलाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला.
कधी करतात घुमजाव, कधी घेतात माघार
साहेब त्यापेक्षा एकदाच बोलून टाका ना #फिर_एक_बार_मोदी_सरकार @NCPspeaks @PawarSpeaks pic.twitter.com/ymoSgOG0CX— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 25, 2019
माढा 100 टक्के जिंकणार
आता माढाची सीट शंभर टक्के भाजपच जिंकणार असे रणजितसिंह मोहिते-पाटील म्हणाले. तर बारामतीचा जीव चार जागांमध्ये आहे. चार खासदारांचा पक्ष स्वतःला राष्ट्रीय पक्ष म्हणवितो. आता या चार जागाही त्यांच्याकडून काढून घ्यायच्या आहेत असे चंद्रकांत पाटील म्हणाले.































































