
मोबाईलमध्ये फेक अॅप डाऊनलोड करून त्याद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोबाईल क्रमांक नोंदवून नामांकित बांधकाम व्यावसायिक गोयलगंगा ग्रुपचे एमडी अतुल जयप्रकाश गोयल यांना 20 लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट एकने सहाजणांना दोन लाखांची खंडणी घेताना अटक केली. त्यांच्याकडून मोटार, दुचाकी, सहा मोबाईल, दोन लाखांची रोकड असा 6 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला.
नवनाथ चोरामले (वय 28 रा. शिरसवाडी), सौरभ काकडे (वय 20 रा. हडपसर), सुनील उर्फ बाळा वाघमारे (वय 28, रा. थेऊर), किरण काकडे (वय 25, रा. थेऊर), चैतन्य वाघमारे (वय 19, रा. भेकराईनगर), आकाश निकाळजे (वय 24, रा. शिरसवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी बिल्डर अतुल जयप्रकाश गोयल (वय 47, रा. वानवडी) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
गोयल यांनी 20 वर्षांपूर्वी शिरसवाडी वाढे-बोल्हाईत जमीन खरेदी केली आहे. मात्र, संबंधित जमीन विक्रीनंतरही आरोपींनी बिल्डरला धमकाविले. वाट मिटविण्यासाठी 20 लाखांची खंडणी मागितली होती. ही कामगिरी पोलीस आयुक्त अभिताभ गुप्ता, सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, एपीआय संदीप बुवा, उपनिरीक्षक संजय गायकवाड, उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, विकास जाधव, सतीश भालेकर, महेश बामगुडे, अशोक माने, इम्रान शेख, अजय थोरात, शशिकांत दरेकर, अनिकेत बाबर, विजेसिंग वसावे, दत्ता सोनावणे, तुषार माळवदकर, यशवंत ओंबासे, रमेश चौधर, दुर्योधन गुरव, विवेक जाधव, राजेंट लांटो अमोल आहाट यांनी केली
उपमुख्यमंत्र्यांच्या पी.ए.चा काढला आवाज
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकावरून फोन केल्याचे दर्शविले. त्यांच्या पी.ए.चा आवाज काढून बिल्डरला धमकाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधितांना गुन्हे शाखेने अटक केली.
बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी स्वीकारण्यासाठी आरोपींनी फेक अॅपद्वारे मंत्रीमहोदयांचा मोबाईल क्रमांक समाविष्ट केला. त्यानंतर वाद मिटविण्यासाठी 20 लाखांची खंडणी मागत दोन लाख रुपये स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आली.
– शैलेश संखे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गनिट कटे शारता





























































