रानु मंडल यांचं दुसरं रुप समोर, नेटकरी चिडले

4836

एका व्हायरल व्हिडीओमधून एका रात्रीत सेलिब्रिटी झालेल्या रानु मंडल यांचं नाव चांगलच गाजतं आहे. मात्र आता रानु मंडल यांचा एक वेगळं रुपही समोर आलं आहे. रानु यांचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला असून त्यात त्या संतापलेल्या दिसत आहेत.

रानु मंडल हे नाव तर आपल्या परिचयाचेच आहे. कारण काही दिवसांन पूर्वी रानु मंडल ही रस्ते, फुटपाथ, लोकलट्रेन आशा ठिकाणी गाणे गाऊन भिक मागणाऱ्या पैकी एक होती. परंतु या रानु मंडलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि प्रेक्षकांनी रानु मंडलच्या या व्हिडीओला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. हिमेश रेशमीयाने रानु मंडल यांना संधी दिली. अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होऊ लागले आणि प्रेक्षकांनी देखील त्यांच्या व्हिडीओला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. त्याच सोबतच तिच्या चाहत्यांची संख्या देखील वाढत गेली. सोशल मीडिया वरील व्हिडीओ नंतर काही चित्रपटांमध्ये गाणे गाण्याची संधी देखील रानु मंडला मिळाली.

प्रेक्षकांनी रानु मंडल यांच्यावर दाखवलेल्या प्रेमामुळेच ती एक स्टार बनली. परंतु ज्या प्रेक्षकांनी आपल्याला भरभरून प्रेम देऊन रस्त्यावरून उचलून स्टार बनवले त्याच प्रेक्षकांसोबत आता त्या कशा वागतात हे दाखवणारा एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेमका तिथे काय प्रकार घटला? तर रानु मंडल या एका सुपर मार्केटमध्ये काही वस्तू खरेदी करत होत्या. रानु मंडल यांना पाहताच क्षणी एक महिला चुमुकलीसह त्यांच्याजवळ आली आणि रानु मंडल यांच्या हाताला स्पर्श करत सेल्फी मागितला. मग काय रानु मंडलने सेल्फी तर दिलाच नाही उलट त्या महिलेलाच झाडले. ज्या चाहत्यांनी रानु मंडल यांना इतक्या उंचीवर नेऊन ठेवले त्यांच्यासोबत त्यांनी असा व्यवहार करणं योग्य आहे का? असा सवाल नेटकरी करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या