वा, दाजी! फुल्ल डोले-शोले हा… रणवीर सिंहने घेतली निक जोनसची फिरकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूडचा स्टार अभिनेता रणवीर सिंह हा आपल्या दमदार अभिनयासह हटके पोस्टसाठीही ओळखला जातो. दीपिका पदुकोणचा या अवलिया पतीचे अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्यासोबतही चांगले जमते.

‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटात दोघांनी एकत्र पडदाही शेअर केला आहे. यात प्रियांकाने श्रीमंत पेशवे बाजीराव यांची पत्नी काशिबाई हिची भूमिका केली होती. तेव्हापासून दोघांचे चांगलेच बॉन्डिंग जमले आहे. तसेच प्रियांकाचा पती निक जोनस याच्यासोबतही रणवीरची चांगली मैत्री झाली आहे. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करताना दिसतात. सध्या रणवीरची अशीच एक कमेंट चर्चेचा विषय ठरली आहे.

निक जोनस याने नुकताच एक जीम वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये निक बायसेप्स मारताना दिसतोय. व्हिडीओसोबत निकने ‘लेट्स गेट इट’, असे कॅप्शनही दिले आहे. या व्हिडीओवरच रणवीर सिंह याने मजेशीर कमेंट करत निकला दाजी (जीजू) म्हटले आहे.


View this post on Instagram

A post shared by Nick Jonas (@nickjonas)

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये निक डंबल्सने बायसेप्स एक्सरसाईज करताना दिसत आहे. एकीकडे निकचे चाहते त्याच्या या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडात त्याचे कौतुक करताना दिसताहेत, तर दुसरीकडे रणवीर सिंह मात्र त्याची खेचताना दिसतोय. रणवीरने या व्हिडीओखाली ‘ओहो जीजू, डोले-शोले’ अशी कमेंट केली आहे. यासोबत त्याने बायसेप्सचा इमोजीही शेअर केला आहे.

ranveer

दरम्यान, रणवीर सिंहचा ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘जयेशभाई जोरदार’, ’83’ हे चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. आगामी एक-दोन महिन्यात हे चित्रपट चाहत्यांना पाहता येईल.