
न्यूड फोटो शूटप्रकरणी बॉलिवुड अभिनेता रणवीर सिंग याने आपला जबाब नोंदवला आहे. रणवीर सिंग विरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
काही काळापूर्वी रणवीर सिंगने एका मासिकासाठी न्यूड फोटो शूट केले होते. ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काही सामाजिक संस्थांनी त्या फोटोविरोधात तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारीची दखल घेऊन चेंबूर पोलिसांनी रणवीर सिंगविरोधात भादंवि दंड संहिता कलम 292, 293, 509 आणि आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणी गुरुवारी रणवीरने पोलिसांसमोर आपला जबाब नोंदवला. या जबाबानुसार, आपले फोटो हे मॉर्फ केले गेल्याचा दावा रणवीरने केला आहे. हे फोटो वेगळ्या पद्धतीने काढले गेले होते, असंही रणवीर आपल्या जबाबात म्हणाला आहे.
अभिनेता रणवीर सिंह याच्या नग्न फोटोशूटमुळे खळबळ उडाली होती. अंगावर एकही कपडा न घालता रणवीरने फोटोशूट केलं होतं. या फोटोशूटवर काहींनी आक्षेप नोंदवला तर काहींना त्याच्या ‘बोल्ड’ निर्णयाचं स्वागत केलं होतं. देशभरात त्याच्या या फोटोशूट विरोधात ठिकठिकाणी तक्रारी नोंदवल्या गेल्या तर काहींनी जनहित याचिका देखील दाखल केल्या.
Nude photoshoot controversy | Mumbai Police recorded the statement of actor Ranveer Singh in the nude photoshoot case on Aug 29. As per information accessed now, the actor in his statement has claimed that someone has tampered with and morphed one of the photos of the actor. https://t.co/7rtuPiL9Mh
— ANI (@ANI) September 15, 2022

























































