
सामना प्रतिनिधी । मुंबई
एका शैक्षणिक संस्थेतील महिलेने केलेल्या बलात्काराच्या तक्रारीची दखल घेऊन हायकोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार भाजपच्या मधू चव्हाण यांच्या विरोधात चिपळूण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पत्रकारांनी विचारले असता भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले, मधू चव्हाण यांच्यावर या प्रकरणी आधी दोन वेळा आरोप झाला होता, मात्र पोलिसांना या प्रकरणात तथ्य न वाटल्याने केस बंद झाली होती. आता न्यायालयात प्रकरण असल्याने केस नोंदविण्यात आली आहे. संबंधित महिलेने आपल्याला पत्र लिहिले होते. मी स्वतः मधू चव्हाण यांच्याशी एक वर्षापूर्वी या प्रकरणी बोललो होतो. पुन्हा एकदा मी त्यांच्याशी बोलेन. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यानंतरच निर्णय घेण्यात येईल.
भाजपचे दुसरे प्रवक्ते आमदार राम कदम यांच्या वक्तव्याबद्दलदेखील त्यांना पक्षातर्फे समज देण्यात आली होती. त्यांच्या वक्तव्याला पक्षाने कधीच पाठिंबा दिलेला नाही, असेही दानवे म्हणाले.
summary: BJP state president raosaheb danve replied bjp madhu chavan case




























































