अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून गर्भवती केलं, लग्नास तयार झाल्याने विवाहित आरोपीला जामीन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत एका 25 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. यात मुलगी गरोदर झाली असून तिने एका बाळाला जन्म दिला आहे. या प्रकरणी आरोपीने पीडित मुलीशी लग्न करण्याची तयारी दर्शवली आहे, त्यामुळे आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दिनेश (नाव बदलेले) याचे एका 16 वर्षीय मुलीसोबत प्रेमसंबंध होते. दिनेशचे लग्न झालेले असतानाही त्याचे या मुलीशी प्रेमसंबंध होते. मुलीच्या वडिलांची आणि दिनेशची ओळख होती. वडिलांच्या माध्यमातूनच दिनेशची आणि मुलीची ओळख झाली.

दिनेशने मुलीवर बलात्कार केला आणि त्यात मुलगी गरोदर राहिली. आपण या बाळाचे बाप आहोत असे कुणाला सांगू नकोस अशी धमकी दिनेशने मुलीला दिली होती. जेव्हा पीडित मुलीच्या आईला जेव्हा ही बाब कळाली तेव्हा तिने पोलिसांत धाव घेतली.

पोलिसांनी पोक्सो अंतर्गत कारवाई करत दिनेशला अटक केली. मुलीचे वय 18 झाल्यानंतर आपण तिच्याशी लग्न करू असे वचन दिनेशने आधीही दिले होते. पण मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार केल्याने हे प्रकरण कोर्टात गेले. तेव्हा कोर्टान न्यायाधीशांनी सांगितले की आरोपीचे लग्न झाले होते ही बाब मुलीला माहित होती. तसेच मुलगी सज्ञान झाल्यावर तो लग्न करण्यास तयार होता. हा मुद्दा प्रेमसंबंध आणि संमतीच आहे. त्यामुळे आरोपीला तुरुंगात ठेवण्याची काही गरज नसल्याचे न्यायाधीशांनी  सांगितले.