वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवलेल्या उमेदवारावर बलात्काराचा गुन्हा दाखल

798
rape
प्रातिनिधिक फोटो

वंचित बहुजन आघाडीतुन हातकणंगले लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविलेले उमेदवार हाजी अस्लम सय्यद याच्याविरोधात पत्नीनेच बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी संबंधित महिलेने शिरोली एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली आहे.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, शिरोली येथील ठमके गल्लीत एका फ्लॅटमध्ये हि महिला राहत होती. तिच्या पतीचे निधन झाले आहे. एका क्वारंटाईन केंद्रात सय्यद आणि या महिलेची भेट झाली होती. नंतर लग्नाचे आमिष दाखवून सय्याद याने आपल्याशी संबंध ठेवल्याचे महिलेने सांगितले. तसेच 9 मे रोजी मुस्लिम रिवाजाप्रमाणे इचलकरंजी येथील एका मशीदीत दोघांनी लग्नही केले. नंतर त्याने जबाबदारी झटकल्याने महिलेला धक्का बसला आणि तिने  पोलिसांत धाव घेत सय्यद विरोधात थेट बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

यापूर्वी आणखी चार विवाह त्याने केल्याचा आरोप या महिलेकडुन करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपी सय्यदला न्यायालयात हजर केले असता पाच दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या