लग्नाच्या भूलथापा देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर जिल्ह्यातील वाढवणा बु.येथे लग्नाच्या भूलथापा देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी गेल्या सहा महिण्यांपासून अल्पवयीन मुलावर बलात्कार करत होता. आरोपी जीपचालक असून त्याच्याविरोधात वाढवणा बु. पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाढवणा बु. येथील जीपचालक बालाजी कोंडीबा सोनकांबळे (वय 36) हा 16 वर्षांच्या मुलीला लग्नाच्या भूलथापा देत सहा महिण्यांपासून शारीरिक संबंध ठेवत होता. मुलीच्या आजीने सोमवारी दिलेल्या तक्रारीवरून पोलीसांना बालाजी सोनकांबळे याच्याविरुद्ध. पॉक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी रात्रीच त्याला मुंबईस पळून जाण्याच्या तयारीत असताना अटक केली आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.