हरयाणात अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन बलात्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । फतेहबाद

हरयाणामध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फतेहाबादमधील ही घटना असून नरधमांनी तिचे आधी अपहरण केले आणि तिच्यावर अत्याचार केले. पीडितेच्या आईने केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेच्या आईने दिलेल्या माहितीनुसार रात्री उशिरा अल्पवयीन मुलगी झोपली होती. त्यानंतर ती काही कामासाथी उठली तेव्हा गावातील दोन तरुणांनी तिचे अपहरण केले. एका निर्जन ठिकाणी तिला नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सदर आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.