
पुस्तक देण्याचा बहाणा करून वर्गमैत्रिणीला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना दहिसर येथे घडली. या प्रकरणी दहिसर पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
पीडित मुलगी ही दहिसर येथील एका खासगी शाळेत शिकते. त्याच शाळेत तो मुलगा शिकतो. नुकतेच त्याने मुलीला पुस्तक देण्याचा बहाणा करून घरी बोलावले. त्यावर विश्वास ठेवून मुलगी घरी गेली. तेव्हा त्याने तिच्यावर अत्याचार केला.
घडला प्रकार कोणालाही सांगू नये अशी धमकी दिली. त्या घटनेने मुलगी घाबरली होती. तिने याची माहिती तिच्या वडिलांना दिली. त्यानंतर वडिलांनी दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून त्या मुलाला ताब्यात घेतले.