मालवणात गतीमंद मुलीवर बलात्कार, एकाला अटक

1237

 

मालवणमध्ये एका मतिमंद मुलीवर बलात्कार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे.

मतिमंद मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दिगंबर ठाकुर याला मालवण पोलिसांनी अटक केली आहे. पीडित युवती पाच महिन्याची गरोदर आहे. युवतीच्या आईला ही घटना समजताच तिने ओरोस पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबतची तक्रार दिली आहे. संशयित आरोपी दिगंबर हा तालुक्यातील एका महाविद्यालयात चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून कामास आहे. त्याला रविवारी अटक करून न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पीडित युवतीने तालुक्यातील एका शाळेत नववी पर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर गावातच एका ठिकाणी घरकाम करण्यास ती जात होती. 26 ऑक्टोबर सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास तिने आपल्या आईस पोटात दुखत असल्याचे सांगितले. त्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी ती पाच महिन्यांची गरोदर असल्याचे स्पष्ट केले. आईने विचारपूस केली असता तिने दिगंबर ठाकूर याचे नाव घेतले. तसेच महाविद्यालयाच्या शौचालयात जबरदस्तीने घेऊन जात तीनवेळा शारीरिक संबंध ठेवले व कोणालाही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली असेही पीडीत मुलीने सांगितले. पीडित युवतीच्या आईने रविवारी ओरोस पोलिस ठाणे गाठत याबाबतची तक्रार दिली.

त्यानुसार पोलिसांनी आरोपी दिगंबर ठाकूर याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या