उत्तर प्रदेशमध्ये दोन बहिणींवर बलात्कार, आरोपी होता पोलिसांच्या वेषात

829

उत्तर प्रदेशमध्ये एका नराधमाने पोलिसांच्या वेषात दोन सख्ख्या बहिणींवर बलात्कार केला आहे. रविवारी ही घटना घडली असून पीडित मुलींवर उपचार सुरू आहेत.

संभळ जिल्ह्यात एक व्यक्ती पोलीस शिपायाच्या पोशात दोन मुलींच्या घरी आला. तुमचे कुटुंबीय बनावट दारू बनवात असा बनाव त्याने रचला. तसेच पुढील कारवाईसाठी त्याने दोन्ही मुलींना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यासाठी जबरदस्तीने गाडीत बसवले आणि एका निर्जन स्थळी नेले. नराधमाने आळीपाळीने दोन्ही बहीणींवर बलात्कार केला आणि तिथून निघून गेला. नंतर दोन्ही बहीणी कशाबशा घरी पोहोचल्या. तेव्हा कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. आहे.

आपली प्रतिक्रिया द्या