बलात्कार पीडिता कोरोना बाधित, आरोपी कारागृहात क्वारंटाईन

649

कोरोना व्हायरस संक्रमण रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलं आहे. दिल्ली येथे कोरोनाबाधितांची संख्या सात हजारांवर गेली आहे. दरम्यान, दिल्ली येथे अजून एक कोरोनाबाधित रुग्ण सापडला आहे. येथील एका बलात्कार पीडितेला कोरोनाची बाधा झाल्याचं तपासणीत आढळलं आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली येथे एका बलात्कार पीडितेला कोरोनाची लक्षणे दिसल्यामुळे तिची तपासणी करण्यात आली. तेव्हा तिला कोरोना असल्याचं आढळलं. तिला कोरोना झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्याचा आरोप असलेल्या आरोपीला तिहार येथे क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्याच्यासह अजून दोन आरोपींना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यांची तपासणी करण्यात येत असून बलात्कार पीडितेवरही उपचार करण्यात येत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या