राहुल गांधी यांना फेसबुकची नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॅन्टोन्मेंटमधील 9 वर्षीय दलित बालिकेवर बलात्कार करून तिची हत्या करण्याच्या प्रकारानंतर पीडित कुटुंबीयांची काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भेट घेतली होती. पीडित कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठीच्या भेटीचे छायाचित्र सोशल साईट्सवर का टाकलेत आणि पीडितेची ओळख जगजाहीर का केलीत, असा सवाल विचारणारी नोटीस राहुल यांना पाठवली आहे.

1 ऑगस्टला दिल्ली कॅन्टोन्मेंट भागातील दलित बालिकेवर बलात्कार करून तिची बलात्काऱयांनी निर्घृण हत्या केली होती.गेल्या आठवडय़ात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते. त्यानंतर या कुटुंबीयांसोबतचे छायाचित्र इंस्टाग्राम आणि फेसबुकवर टाकले होते.