
मनोरंजन विश्वातील तमाम सेलिब्रिटी बऱ्याचदा सामाजिक प्रश्नांवर भाष्य करतात. याच दरम्यान, रितेश देशमुख यानेही एका गंभीर घटनेवर भाष्य केलं आहे. ट्वीट करून त्याने बलात्कारासारख्या एका गंभीर विषयावर त्याने रोखठोक मत व्यक्त केलं आहे.
काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील ललितपूर येथे 13 वर्षांच्या मुलीवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. या घटनेची तक्रार दाखल करायला गेलेल्या पीडितेवर तिथल्या पोलिसानेही अत्याचार केले. या प्रकरणावर रितेश देशमुखने राग व्यक्त केला आहे. त्याने ट्वीट करून सरकारकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.
तो म्हणाला आहे की, ही घटना खरी असेल तर यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही. रक्षकच जर भक्षक बनत असेल तर सामान्य माणूस न्याय मागायला कुठे जाईल? अशांना भरचौकात ठार मारलं पाहिजे. सरकारने लवकरच कारवाई करावी, असं तो या ट्वीटमध्ये म्हणाला आहे.
अगर यह सच है तो इससे बदतर कुछ नहीं हो सकता। रक्षक ही भक्षक बन जाए तो आम इंसान न्याय माँगने कहाँ जाए। ऐसे लोगों को सरे आम, चौराहे पर मारना चाहिए। साकार जल्द कार्यवाही करे और सख़्त से सख़्त सजा दे। https://t.co/lYuNBZB3cK
— Riteish Deshmukh (@Riteishd) May 4, 2022




























































