जगातील दुर्मिळ मांजर आरेमध्ये

1228

जगातील सर्वात दुर्मिळ  जगातील सर्वात लहान मांजर मुंबईत आरेमध्ये आहे अशी माहिती वन्यजीव छायाचित्रकार नयन खानोलकर यांनी दिली. ही मांजर रस्टी स्पॉटेड कॅट किंवा रानमांजर म्हणूनही ओळखली जाते, असेही खानोलकर यांनी नमूद केले. 

आरे कारशेडच्या जागेपासून 500 मीटर अंतरावर या जगातल्या दुर्मिळ मांजराचे वास्तव्य असल्याचा व्हिडीओ आम्हाला मे 2019 मध्ये मिळाला आहेही मांजर शेड्युल एकमध्ये  अतिशय दुर्मिळ आहेवाघटी तसेच सिव्हेट कॅटही आरेमध्ये  आढळून येतेआरेमधील जैवविविधत आम्ही कॅमेर्‍यात कैद केल्याचे ते म्हणाले.

संजय गांधी उद्यान  आरे कॉलनी

संजय गांधी उद्यान  आरे कॉलनी सलग आहेतिथे वन्य जीवांचे येणे जाणे सुरु असतेआपल्यासाठी आरे वेगळे  संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वेगळे असले तरी वन्य जिवांसाठी त्या सीमा नाहीतत्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन्य जीव आरेमध्ये येतजात असतातनॅशनल पार्क हा बफर झोनसारखा आहे.

आरे म्हणजे पर्यावरण संस्था

वन्य अभ्यासक राजेश सानप हे 2006 पासून आरे जंगलाचा अभ्यास करीत आहेतविंचूपालींच्या  कोळ्यांच्या  वेगवेगळ्या प्रजातींचा अभ्यास केला आहेत्यांचे नामकरणही केले आहेआरे कॉलनी हा विषय केवळ झाडेबिबळेरानमांजर एवढय़ापुरता मर्यादित नाहीसंपूर्ण पर्यावरण संस्था आरेमध्ये वाढत आहे.

कोळ्यांच्या सहा प्रजाती आरेमध्ये

आरेचा संबंध जैवविविधतेशीही आहेया जैविक साखळीत छोटे जीवही तेवढेच महत्त्वाचे आहेतविंचूकोळी यांचा अभ्याससुरू आहेआरेमध्ये कोळ्यांच्या विविध प्रजाती सापडतातआरेमधील कोळ्यांचा 110 वर्षांनी पुन्हा आम्ही नामकरण केलेआहेआरेमध्ये सापडला म्हणून ‘आरेन्सीस’ असे त्याचे आम्ही नामकरणही केले आहेदेशात कोळ्यांच्या 110 पेक्षा अधिकप्रजाती आहेतआरेमध्ये कोळ्यांचा सहा प्रजाती आहेतदुर्मिळ पालींचेही वास्तव्य आरेच्या जंगलात आहेत याकडे राजेश सानप यांनी लक्ष वेधले.

फुलपाखरे  मधमाश्या

आरेमध्ये असंख्य प्रकारच्या मधमाश्या  फुलपाखरे  पक्षी आहेतआरेमध्ये 120 वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेतत्यात  स्थलांतरित पक्षीस्थानिक पक्षी यांचा समावेश आहेआरेमध्ये अतिशय दुर्मिळ फुलपाखरे सापडतातदेशाचा राष्ट्रीय पक्षी मोर जसा आरेमध्ये सापडतो तसाच ‘राज्याचे फुलपाखरू’ म्हणून दर्जा मिळालेले फुलपाखरूही आरेमध्ये सापडतेअजगरही या जंगलात आहेतया जंगलात अजून असंख्य प्रजाती आहेतपण त्यावर संशोधन होणे बाकी आहेपण त्याआधीच  जंगल संपुष्टात येण्याची भीती आहेत्यासाठी अभ्यास करण्याची गरज राजेश सानप यांनी व्यक्त केली.

कारशेडमुळे पर्यावरणाला धोका

आरे कॉलनीबाबत तांत्रिक समितीने 2015 मध्ये सर्व्हे करून एक अहवाल दिला आहेत्यानंतर 2019 मध्येही एक  अहवाल दिला आहेआरे कॉलनीत जैवविविधता आहे असे या दोन्ही अहवालात नमूद केले आहेआरेमध्ये क्राँकीटीकरण केले तर पावसाचे पाणी मिठी नदीत वाहून जाईल  त्यातून चकाला  आंतरराष्ट्रीय विमानतळावर पूरस्थिती निर्माण होईलआरे कॉलनी हे बिबट्याचे आश्रयस्थान आहे आणि आरेमध्ये कारशेड केल्यास पर्यावरणाला धोका निर्माण होऊ शकतो असे ‘नीरीच्या अहवालातही नमूद केले आहे.

वन्य जीव आहेच

आरेमध्ये वन्य जीव नाही असे सांगितले जात आहेमग हे काय आहेअसा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी या सादरणीकरणाच्या वेळेस केला.

आपली प्रतिक्रिया द्या